Monday, July 1, 2024
HomeदेशLoksabha Election results 2024 : मतमोजणीसाठी निवडणूक आयोग सज्ज! कशी असणार प्रक्रिया?

Loksabha Election results 2024 : मतमोजणीसाठी निवडणूक आयोग सज्ज! कशी असणार प्रक्रिया?

पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाच्या (Loksabha Election results 2024) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. उद्या निवडणुकांचा निकाल येणार आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आपण मतदानाचा विश्वविक्रम केला आहे, असं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ( Chief Election Commissioner Rajiv Kumar) यांनी म्हटलं. यावर्षी ६४ कोटी लोकांनी मतदान केलं व त्यात ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या काळात तरुण या मतदानातून प्रेरणा घेतील असं राजीव कुमार म्हणाले. यावेळी त्यांनी मतमोजणीची (Counting of votes) प्रक्रिया कशी असणार याविषयी देखील माहिती दिली.

मतमोजणीच्या प्रक्रियेविषयी सांगताना राजीव कुमार म्हणाले की, मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत बळकट आहे. १० लाख ५० हजार बूथ आहेत, एका हॉलमध्ये चौदा टेबल्स असतील. ८ हजारांहून अधिक उमेदवार आहेत, त्यांचे पोलिंग एजंटही असतील. निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षकही त्या ठिकाणी असणार आहेत. ७० ते ८० लाख लोक यासाठी काम करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, आमच्याकडून कुठल्याही प्रकारची तांत्रिक चूक होणार नाही, याची आम्ही पूर्णतः काळजी घेणार आहोत. तसेच मानवी चूक झाली तर आम्ही ती तातडीने सुधारू, कारण ती कोणाकडूनही होऊ शकते. प्रत्येक ठिकाणी CCTV लावल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ६ वाजता काय होणार? त्यानंतर १५ मिनिटांनी काय होणार हे सगळं ठरलं आहे. सगळी प्रक्रिया आणि मतमोजणी कशी करायची हे सगळं ठरलं आहे, असंही ते म्हणाले.

प्रचारादरम्यान स्त्रियांचा अनादर होऊ नये यासाठी कडक सूचना

स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले. एकाही राजकीय नेत्याकडून प्रचारात स्त्रियांविषयी अपशब्द निघणार नाहीत याची काळजी आम्ही घेतली. अशी प्रकरणं समोर आली तेव्हा आम्ही त्यांना सक्त ताकीद दिली. तसंच महिलांच्या विरोधात कुठलाही चुकीचा शब्द जाऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतली. आमच्या मनात स्त्रियांविषयी आदर आहे, असं राजीव कुमार म्हणाले.

होम व्होटिंग करणार्‍यांचे आभार

तसंच होम व्होटिंग ज्यांनी ज्यांनी केलं त्या मतदारांचेही मी अगदी मनापासून आभार मानतो. आमचा अनुभव हे सांगतो की अनेकांनी आम्हाला मतदानासाठी बूथवर यायची तयारी दाखवली. ही बाब कौतुकास्पद आहे. तरुणांना यातून प्रेरणा मिळेल असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

कुणाचीही गय करणार नाही!

निवडणूक उत्साहात पार पडली आहे, आता आम्ही पारदर्शीपणे मतमोजणीला आणि निकालाच्या दिवसाला सामोरे जात आहोत. कुणाकडून काहीही चुकीचं करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही कुणाचीही गय करणार नाही. लोकशाहीची मूळं बळकट करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे सगळ्यांचे आम्ही आभार मानतो असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -