अग्निशमन दलाचे ४ अग्निबंब घटनास्थळी
मुंबई : मुंबईतील लोअर परळच्या (Lower parel) एका इमारतीला आग लागल्याची (Fire news) घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाह अँड नाहर इंडस्ट्रीज या इमारतीतील एका गाळ्याला आज दुपारच्या सुमारास ही आग लागली.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ४ अग्निबंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पोहोचल्यानंतर आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गाळयाला आग लागल्यानंतर इमारतीमधील लोक खाली उतरले. तर घटनास्थळी देखील बघ्यांची गर्दी झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी आग विझविण्यासाठी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले.