Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीदेशभरात आजपासून महाग झाले Amul दूध, प्रति लीटर इतक्या रूपयांची वाढ

देशभरात आजपासून महाग झाले Amul दूध, प्रति लीटर इतक्या रूपयांची वाढ

मुंबई: देशभरात सोमवारपासून म्हणजेच ३ जूनपासून अमूलच्या दूध दरात २ रूपये प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल दुधाचे दर वाढवण्यात आले आहेत. आता अमूल गोल्डचे दर ६४ रूपये प्रती लीटरवरून वाढून ६६ रूपये प्रती लीटर झाले आहेत. तर अमूल टी स्पेशल दुधाचे दर ६२ रूपयांवर ६४ रूपये प्रती लीटर झाले आहेत.

याबाबत अमूलचे म्हणणे आहे की वाढलेले दर हे केवळ ३-४ टक्क्यांची वाढ आहे जी अन्नमहागाई पेक्षा खूप कमी आहे. फेब्रुवारी २०२३ पासून हे दर वाढलेले नव्हते. यामुळे ही वाढ गरजेची होती. अमूलचा दावा आहे की दुधाच्या उत्पादनात आणि ऑपरेशन कॉस्टमध्ये वाढ झाल्याने हे दर वाढवण्यात आले. गेल्या वर्षी अमूलच्या दूध संघाने शेतकऱ्यांच्या दरात ६-८ टक्के वाढ केली होती.

अमूलच्या पॉलिसीनुसार ग्राहकांनी दिलेल्या १ रूपयांपैकी ८० पैसे दूध उत्पादन कर्त्याला जातात. सोबतच दह्याच्या दरातही वाढ झाली आहे. यासंबंधित अमूलकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र गुजरातच्या सहकाही दूध विपणन संघाने आपल्या वितरकांना नव्या किंमतीची एक यादी पाठवली आहे.

याआधी एप्रिल २०२३मध्ये अमूलने गुजरातमध्ये आपल्या दुधाच्या किंमतीत वाढ केली होती. गुजरात सहकारी दूध विपणन संघाने संपूर्ण राज्यात अमूल दूधाच्या किंमतीत दोन रूपयांची प्रति लीटर वाढ केली होती. २०२३मध्ये वाढ केल्यानंतर अमूलच्या म्हशीच्या दुधाचे दर ६८ रूपये प्रती लीटर झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -