Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Sunita Williams : सुनिता विल्यम्सचा अंतराळ प्रवास पुन्हा लांबणीवर!

Sunita Williams : सुनिता विल्यम्सचा अंतराळ प्रवास पुन्हा लांबणीवर!

उड्डाणाच्या ३ मिनिटाआधी काय घडले?

मुंबई : भारतीय वंशाची अंतराळवीर (Astronaut) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) तिसऱ्यांदा अंतराळ प्रवासाला जाणार होती. मात्र हा प्रवास अंतिम टप्प्यात येऊन काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे सुनीता विल्यम्सची तिसरी झेप पुन्हा लांबणीवर गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंतराळवीर सुनीता विल्यम्स कल रात्री १० च्या सुमारास सहकारी अंतराळवीर बॅरी बुच विल्मोरसोबत नासाच्या बोइंग स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये उड्डाण करणार होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे हा प्रवास पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

उड्डाणाच्या तीन मिनिटाआधी मोजणी थांबली

सुनीत विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळ प्रवासाला जाणार होती. मात्र प्रवास सुरू होण्याच्या तीन मिनिटे आणि ५० सेकंद आधी प्रक्षेपण थांबवण्यात आले. त्यानंतर हा प्रवास पुढे ढकलण्यात आला. यामागे तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. शेवटच्या क्षणी प्रवास थांबवावा लागल्याची घटना दुसऱ्यांदा घडली आहे. तर संगणकाने मतमोजणी का थांबवली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Comments
Add Comment