Friday, July 19, 2024
Homeक्राईमPune Accident : अगरवाल पती-पत्नीस ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

Pune Accident : अगरवाल पती-पत्नीस ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

दोघांची सखोल चौकशी करण्यासाठी सरकारी वकीलांचा युक्तिवाद

पुणे : पुण्यातील (Pune) कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे (Hit And Run) राज्यासह देशभरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. बिल्डर विशाल अग्रवाल (Vishal Agarawal) यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे (Porsche Car Accident) कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागला आहे.

या प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत. पोलिसांनी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवालसहित कुटुंबाची कुंडली बाहेर काढली आहे. आता तर बाळाच्या आईनेही या घटनेत पुरावे झाकल्याचे समोर आले आहे. मुलाच्या वैद्यकीय चाचणीदरम्यान ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. ते मुलाच्या आईचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तशी कबुली आईने पोलिसांसमोर दिली आहे. दोघांचीही सखोल चौकशी करण्यासाठी रविवारी कोर्टात सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामद्धे विशाल आणि शिवानी अग्रवाल यांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

न्यायालयात सरकारी वकिलांनी काही महत्वाचे मुद्दे मांडत पोलीस कोठडी मागितली. आरोपीच्या वकिलांनीसुद्धा यावेळी युक्तिवाद केला. १९ तारखेला अपघात झाल्यानंतर घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. सी सी टिव्ही सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलिसांना सरेंडर केले आहे. तपास अधिकाऱ्यांना कधी ही गरज लागली तर आरोपी हजर राहतील. असे मुद्दे मांडत म्हणून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.

अनेक घटनांच्या सखोल चौकशी अजून बाकी

विधी संघर्षात बालकाचे हे पालक आहेत. रक्त बदलण्याच्या प्रकरणात पालकांचा थेट समावेश आहे. शिवानी अगरवाल हिला ससूनमध्ये जायला कोणीतरी सांगितले आहे. रक्ताचे नमुने देण्यासाठी शिवानी यांना कोणी सांगितले, यासाठी तपास करायचा आहे. सखोल चौकशीसाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे. साक्षीदार एफ एस एल यांच्या तपासातून निष्पन्न झाले की, विधी संघर्षात बालकाच्याऐवजी आईचे रक्त वापरण्यात आले. या सगळ्या षडयंत्रामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपींचे डी.एन. ए सँपल घ्यायचे आहेत.

३ लाख रुपये कोणाकडून घेतले, याचा तपास करायचा आहे. मूळ रक्त नमुने आणि त्यातील सिरींज कोणाला दिली याचा शोध घ्यायचा आहे. विशाल, शिवानी यांच्या घराची झाडाझडती आहे. तसेच सी.सी. टिव्ही फुटेज जे मिळाले आहे, त्यात छेडखानी झाली आहे. त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी चौकशी अधिकाऱ्यानी मागितली. या मुद्द्यांवरून दोघांना ५ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -