पोस्ट शेअर करत दाखवली ‘लाहोर १९४७’ची झलक
मुंबई : दमदार अभिनय आणि उत्तम व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेली प्रीती बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आहे. आता ती बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान निर्मित ‘लाहोर १९४७’ (Lahore 1947) या चित्रपटातून दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच प्रीतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने ‘लाहोर १९४७’ची स्क्रिप्ट आणि चित्रपटाच्या टीमची झलक दाखवली आहे.
प्रीती झिंटाने शेअर केली पोस्ट
प्रीती झिंटाने हा सर्वात कठीण चित्रपट असल्याचेही या पोस्टद्वारे सांगितले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘लाहोर १९४७’चे शूटिंग पूर्ण झाले आहे. या अद्भुत अनुभवासाठी मी संपूर्ण कलाकार आणि क्रूचे आभार मानते. मी मनापासून आशा करते की, तुम्ही सर्वजण या चित्रपटाचे कौतुक कराल. आम्हाला हा चित्रपट बनवताना जितका आनंद मिळाला तितकाच तुम्ही देखील घ्याल. माझा हा आतापर्यंतच्या कारकिर्दीमधील सर्वात कठीण चित्रपटांपैकी एक आहे. आमिर, सनी, शबाना जी, संतोष सिवान आणि ए .आर. रहमान यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्याचबरोबर काही चाहत्यांनी पोस्टवर कंमेट करून चित्रपटाविषयी उत्सुक असल्याचे सांगितले आहे.
View this post on Instagram