
मुंबई: वयाची चाळिशी पार केल्यानंतर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊ लागते. या वयानंतर म्हातारपणाला सुरूवात होते.चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. हाडे कमजोर होतात. मात्र काही पदार्थांच्या सेवनाने तुम्ही चाळिशीतही तुमचे वय रोखू शकता.
टोमॅटोचा करा डाएटमध्ये समावेश
टोमॅटोमध्ये अँटीएजिंग गुण असतात. यातील लायकोपिन नावाचे तत्व त्वचेला यंग आणि हेल्दी ठेवण्यास मदत करतात. टोमॅटोचे सेवन केल्याने शरीरातील कोलेजनेसची प्रोसेस रोखतात आणि यामुळे स्किनवर ग्लो येतो.
माशांचे सेवन गरजेचे
तुम्हाला जर दीर्घकाळ तरूण राहायचे असेल तर माशांचे सेवन करणे गरजेचे आहे. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. जे शरीराच्या पेशींना एकत्र राखण्यास मदत करतात. सोबतच यातील प्रोटीन स्किनची त्वचा सुधारतात.
नट्सचाही समावेश आवश्यक
नट्समध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळते. जे शरीराच्या पेशी रिपेअर करण्याचे काम करते. यात व्हिटामिन्स आणि पोषकतत्वे आढळतात जी त्वचेला तरूण ठेवण्याचे काम करतात.
दह्यामुळे स्किन ग्लो
दह्यामध्ये व्हिटामिन सी असते ज्यामुळे फोड, पिपल्सचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे सुजेपासून सुटका मिळते. यामुळे पिंपल्स लवकर बरे होण्यास मदत होते.