Wednesday, July 3, 2024
HomeदेशAP Election Result : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची हॅटट्रिक!

AP Election Result : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची हॅटट्रिक!

सिक्कीममध्ये पुन्हा प्रेमसिंग तमांग यांचे सरकार

नवी दिल्ली : जून रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालापूर्वी आज दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. सिक्कीम (Sikkim) आणि अरुणाचल प्रदेशमधील (Arunachal Pradesh) विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, त्यापैकी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाने (BJP)दणदणीत विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेतील ६० जागांपैकी तब्बल ४६ जागांवर भाजपाने कब्जा केला आहे. यापैकी १० जागांवर भाजपाने बिनविरोध विजय मिळवला होता. (AP and Sikkim Election Result)

१० जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्याने उर्वरित ५० जागांसाठी मतदान झाले होते. त्या जागांवरील मतमोजणी रविवारी सकाळपासून सुरू झाली. तसेच या मतमोजणीमध्ये भाजपाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा भाजपाच्या खात्यात विधानसभेतील ६० पैकी ४६ जागा जमा झाल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एनपीईपीने ५ जागांवर विजय मिळवला. ३ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तर पीपीएला २ आणि काँग्रेसला १ जागा मिळाली. त्याशिवाय अपक्ष आमदार ३ जागांवर निवडून आले.

सिक्कीममध्ये पुन्हा प्रेमसिंग तमांग यांचे सरकार

लोकसभा निवडणुकीसह झालेल्या सिक्कीम विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग (Prem Singh Tamang) यांच्या सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. ३२ सदस्यांच्या सिक्कीम विधानसभेत एसकेएमने आतापर्यंत १९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे एसकेएमला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटने फक्त एक जागा जिंकली आहे.

सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात मुख्य लढत झाली. विधानसभेच्या ३२ जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने विधानसभा निवडणुकीत ३२ पैकी १७ विधानसभा जागांवर बहुमताचा आकडा पार केल्याने सत्ता कायम ठेवली आहे. एसकेएमने १८ जागा जिंकल्या असून १३ जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणी सुरू आहे. तर एसडीएफने एक जागा जिंकली असून एका जागेवर आघाडी आहे.

२०१९ च्या निवडणुकीत २४ वर्षांपासूनची एसडीएफची सत्ता संपुष्टात आली होती. २०१३ मध्ये स्थापन झालेल्या सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पराभव केला होता.

१९८४ पासून काँग्रेस सत्तेबाहेर

सिक्कीममध्ये १९८४ पासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. सिक्कीम राज्याच्या निर्मितीनंतर काँग्रेस फक्त दोनदा सत्तेवर येऊ शकली. १९७५ ते १९७९ आणि त्यानंतर बीबी गुरुंग हे १४ दिवस (११ मे १९८४ ते २५ मे १९८४ पर्यंत) मुख्यमंत्री होते. यानंतर काँग्रेसला सिक्कीममध्ये परतता आले नाही. येथे केवळ प्रादेशिक पक्षांचीच सत्ता आहे. सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) चे पवन चामलिंग हे सर्वाधिक पाच वेळा (१९९४, १९९९, २००४, २००९ आणि २०१४) सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. २०१९ मध्ये प्रथमच सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) ने मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखाली SDF चा पराभव केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -