मुंबई: भारतातील सगळ्यात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक Vi (Vodafone-Idea) ने नेटफ्लिक्ससोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. या पार्टनरशिपसोबत कंपनीने २ नवे प्रीपेड प्लान्स लाँच केले आहे.
या प्लान्समध्ये युजरला टेलिकॉम फायद्यांसह Netflixचे सबस्क्रिप्शनही मिळेल. या प्लान्सची किंमत ९९८ रूपये आणि १३९९ रूपये आहे. ९९८ रुपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी ७० दिवसांची आहे तर १३९९ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे.
Vi चा ९९८ रूपयांचा प्लान
या प्लानची व्हॅलिडिची ७० दिवसांची आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज वापरासाठी १.५ जीबी डेटा मिळतो. सोबतच प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सामील आहे. युजरला १०० एसएमएसची सुविधाही मिळते. जर तुमचा १.५ जीबी डेटा संपत असेल तरीही इंटरनेट सुरू राहील. मात्र त्याचा स्पीड कमी होऊन ६४केबीपीएस होईल. यात तुम्हाला Netflixचे सबस्क्रिप्शनही फ्रीमध्ये मिळेल.
Vi चा १३९९ रूपयांचा प्लान
वोडाफोन आयडियाचा दुसरा प्लान १३९९ रूपयांचा आहे. या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास यात ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. सोबतट डेटा, कॉलिंग आणि एसएमएसचे फायदेही िळतात. डेटाबद्दल बोलायचे झाल्यास या पॅकमध्ये आपल्याला २.५ जीबी डेटा मिळेल. सोबतच या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही मिळते. जर तुमचे डेली डेटा लिमिट संपले तर ६४ केबीपीएसपर्यंत स्पीड मिळेल. या प्लानसोबत तुम्हाला ८४ दिवसांसाठी नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन मिळते.