Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

सलमानच्या फार्म हाऊसबाहेर २४ वर्षीय मुलीचा धिंगाणा, पोलिसांनी केली अटक

सलमानच्या फार्म हाऊसबाहेर २४ वर्षीय मुलीचा धिंगाणा, पोलिसांनी केली अटक

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानप्रती चाहत्यांच्या मनात अपार प्रेम आहे. सलमानच्या फिमेल फॉलोईंगची संख्याही प्रचंड आहे. अनेक मुली तर सलमानवर जीव ओवाळून टाकतात. मात्र याच प्रेमाखातर एक चाहतीने सलमानशी लग्न करण्यासाठी म्हणून पनवेल स्थित त्याच्या फार्म हाऊसच्या ठिकाणी चांगलाच धिंगाणा घातला. त्यानंतर या महिला चाहतीला पोलिसांनी अटक केली.


मुंबईच्या जवळील पनवेल नजीक सलमान खानचे शानदार फार्म हाऊस आहे. आपल्या फार्म हाऊसमध्ये सलमान अनेकदा वेळ घालवत असतो. येथे एका मुलीने चांगलाच गोंधळ घातला. तक्रारीनंतर पोलिसांनी या महिलेस अटक केली.



सलमानशी लग्न करण्याची मागणी करत घातला गोंधळ


अटक करण्यात आलेली ही मुलगी दिल्लीतील आहे. महिला सलमान खानची मोठी चाहती आहे आणि तिचे स्वप्न होते की सलमानशी लग्न करावे. याच इच्छेखातर ती सलमानच्या पनवेलस्थित फार्महाऊस बाहेर पोहोचली आणि तेथे तिने धिंगाणा घातला. स्थानिक लोकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला अटक केली.

Comments
Add Comment