पुणे : पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातात (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन दारुड्या मुलाने दोघांचा बळी घेतला. त्याला वाचवण्यासाठी वडीलांनी कायदा हातात घेतला. मग त्यांच्या रक्षणासाठी आजोबाही मैदानात उतरला. आता तर या दिवट्याला वाचवण्यासाठी चक्क मातोश्रीने कायदा धाब्यावर बसवल्याचे उघडकीस आले आहे. मुलाला वाचवण्यासाठी आईने डॉक्टरांना रक्ताचे नमुने दिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येताच पोलिसांनी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालला (Shivani Agarwal) तातडीने अटक केली आहे.
अटक केल्यानंतर शिवानी अग्रवाल यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत आईकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रक्त नमुने बदलणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये शिवानी अग्रवाल यांचा सहभाग तपासण्यात येणार आहे. सबळ पुरावे हाती लागल्यावरच कारवाई सुरु करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी देखील अल्पवयीन मुलाचे आजोबा आणि वडील विशाल अग्रवाल हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम २०१ अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला ‘तू कार चालवत होता असे पोलिसांना खोटे सांग’ असे विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल आहेत. आरटीओच्या तक्रारीनंतर कलम ४२० च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अग्रवालवर दाखल झाला आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना त्याची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल हा गुन्हा आहे. तर, ड्रायव्हरचे अपहरण व धमकी दिल्याचाही गुन्हा अग्रवाल पिता-पुत्रावर आहे.
दरम्यान, पोर्शे कार अपघातात दिवसेंदिवस गुंता वाढतच चालला आहे. दारू प्यायलेल्या अल्पवयीन तरुणाने दोन जीवांचा बळी घेतला. त्या मुलासाठी बाप तुरुंगात गेला. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेला आजोबाही जेलमध्ये गेला. त्याने ड्रायव्हरला डांबून ठेवले होते. दारू प्यायलेल्या मुलाचा पण ब्लड रिपोर्ट नॉर्मल दिला म्हणून दोन डॉक्टर घरी बसले. पोलीस तपासात दिरंगाई केली म्हणून दोन पोलीस अधिकारी निलंबित झाले. ज्या लॅबने रिपोर्ट दिले ते पण चौकशीच्या फेऱ्यात अडकले. यानंतर काही मद्यविक्रीचे दुकान आणि बार यांचे लिकर लायसन्स सस्पेंड झाले. परिसरातल्या ४९ पब आणि बारवर कारवाई केल्याने ते बंद झाले. या अपघातामुळेच हे पब अनधिकृतपणे चालू असल्याचा साक्षात्कार पोलिसांना आता झाला. मद्यशौकिनांबरोबरच पब, बार चालवणाऱ्या मालक, नोकर, वेटर, नाचणाऱ्या पोरी या सर्वांवर पानशेत धरण फुटल्या सारखी संक्रांत आली. आता या सर्वांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पुढा-यांची पळापळ सुरु आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. सामान्य नागरिक मात्र आजही चिरडला जात आहे. रस्त्यावरून चालणे देखिल मुश्किल झाले आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…