Tuesday, October 8, 2024
Homeक्राईमPune Porsche Accident : ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी खळबळजनक खुलासा!

Pune Porsche Accident : ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी खळबळजनक खुलासा!

बाप लेकानंतर आई गजाआड

पुणे : पुण्यातील हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच याप्रकरणी आणखी एक खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलले होते. त्यानंतर पोलिसांनी ब्लड रिपोर्ट (Blood Report) बदलणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक केली होती. मात्र बदलण्यात आलेले रक्त नेमके कुणाचे याप्रकरणी पोलिसांकडून कडक तपास सुरु होता. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील कल्याणीनगर पोर्शे कार अपघातात बिल्डरच्या आरोपी मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. आरोपीने मद्यपान केले आहे की नाही यासाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी आरोपीचे नमुने कचऱ्यात फेकून देत दुसऱ्या कुणाचे तरी नमुने तपासणी साठी दिले. पोलिसांच्या कठोर तपासानंतर डॉक्टरांनी बदललेले ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिचे असल्याचे, लॅब रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे.

अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक

मुलाला वाचवण्यासाठी आईने डॉक्टरांना रक्ताचे नमुने दिले होते, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. असा प्रकार समोर येताच पोलिसांनी शिवानी अग्रवालला तातडीने अटक केली आहे. त्यामुळं हे प्रकरण अजूनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज शिवानी अग्रवालची कसून चौकशी केली जाणार आहे.

बाप-लेकास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने बेजबाबदारपणे गाडी चालवली, त्यात अपघात होऊन दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर, पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि त्याचे वडिल सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी व अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आता न्यायालयाने दोन्ही बाप-लेकास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, अल्पवयीन आरोपीची देखील आज पुणे पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. बाल हक्क न्याय मंडळाकडून पुणे पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. पोलीस तब्बल दोन तास अल्पवयीन मुलाची चौकशी करणार असून चौकशीत तो नेमकं काय सांगतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -