Saturday, July 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPune News : शनिवारवाड्यासमोर बेवारस बॅगेमुळे उडाली खळबळ!

Pune News : शनिवारवाड्यासमोर बेवारस बॅगेमुळे उडाली खळबळ!

पोलिसांसह बाॅम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल

पुणे : पुण्यात कार अपघात, गोळीबार, हल्ला अशा घटना सातत्याने उघडकीस येताना आणखी एक मोठी माहिती उघडकीस आली आहे. पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याजवळ (Shaniwarwada) दररोज लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. आजही अनेकांना शनिवारची सुट्टी असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत होती. मात्र अशातच या शनिवारवाड्यासमोर एक बेवारस बॅग (Abandoned Bag) आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण शनिवार वाड्यातील पर्यटकांना बाहेर काढून परिसर रिकामा करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांसह बाॅम्ब शोध पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

दरम्यान, याप्रकरणाबाबत पोलीस आणि शोध पथकाकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -