Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीमतमोजणीनंतर रत्नागिरी येथे विजयाच्या आनंदोत्सवात सहभागी व्हा

मतमोजणीनंतर रत्नागिरी येथे विजयाच्या आनंदोत्सवात सहभागी व्हा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती

महायुतीची निष्ठा, महायुतीचे ऐक्य कायम ठेवा

पुढच्या सर्व निवडणुका महायुती मधून लढवू

कुडाळ : लोकसभा निवडणुकीच्या माझ्या प्रचारासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी मेहनत घेतली व निष्ठेने काम केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. रत्नागिरी येथील मतमोजणीनंतर आपल्या विजयाच्या आनंदोत्सवात सामील व्हा अशी त्यांनी सर्वांना विनंती केली. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे बळ फार मोठे आहे. कोकण पदवीधर निवडणुकीसह पुढच्या सर्व निवडणुका महायुतीतून लढवू व महायुतीची निष्ठा व महायुतीचे ऐक्य कायम ठेवू, असे आवाहनही त्यांनी कुडाळ येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत केले.
भाजपच्या जिल्हा कार्यकारणी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मतमोजणीनंतरचा महायुतीचा विजयोत्सव व २६ जून रोजी होत असलेली कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी भाजप नेते आमदार नितेश राणे, अतुल काळसेकर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सुरेश गवस, सौ. श्वेता कोरगावकर, सौ. वर्षा कुडाळकर आधी महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर होते. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये माहितीची ही बैठक संपन्न झाली.

नारायण राणे म्हणाले की,पदवीधर निवडणुकीत विजयी होण्यासाठी आपण सर्व सज्ज आहोत.लोकसभेत महायुती कडून उमेदवारी दिली.सर्वानी चांगलं काम केले त्यामुळे ४ जुन रोजी मतमोजणी सुरू होईल त्यावेळी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो.आपण मेहनत केली म्हणून विजय निश्चित आहे.आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.एका बाजूला हा विजय आपल्याला बळ देईलच. त्यामुळे दुसऱ्या बाजूला पदवीधर उमेदवार जोशात विजयी होईल.पदवीधरची निवडणूक वेगळी आहे.आपल्या तिन्ही पक्षाची कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.केंद्रात व राज्यात सत्ता आपली आहे त्यामुळे विजय आपलाच आहे.आमचा विश्वास पक्षाचा विश्वास सार्थकी कराल असा आम्हाला विश्वास आहे.दहावी, बारावीच्या गुणांप्रमाणे आपले कार्यकर्ते अव्वल आहेत हे सिध्द करा.सर्वानी सलोख्याने काम करावे,ही युती अखंड राहावी असं आपलं मत आहे,आपले हे ऐक्य असंच कायम ठेवा असे आवाहन केले.भाजपने मला या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली व महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. पालकमंत्री व राज्याचे जेष्ठ मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक उद्योग मंत्री उदय सामंत आधी सर्वांनी काम केले त्याबद्दल मी आभारी आहे. असेही नारायण राणे म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.

जसा विजय ऐतिहासिक तसा जल्लोषही ऐतिहासिक होईल : आ. नितेश राणे

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित आहे. हा विजय ऐतिहासिक होईलच तर या विजयाचा जल्लोषही तसाच ऐतिहासिक व्हायला हवा.हिशोब चुकता करणार तोही व्याजासकट करणार आहोत, चव्हाण साहेब तुम्ही जरा कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या अशी विनंती ही त्यांनी केली. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपल्या माध्यमातून विजयी निवडणूक व्हायला हवी त्या दृष्टीने काम करा. मतदाराची काळजी करु नका. ते आपल्या ला शोधत येतील. या पदवीधर निवडणुकीत मतदान बाद होण्याचे प्रमाण खुप आहे. पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांना चांगले मतदान झाले पाहिजे, त्यादृष्टीने काम झाले पाहिजे, हे लक्षात ठेवा.आता आपल्याला कुठे थांबायचे नाही हे लक्षात ठेवा. हा विजयाचा आनंद ४ जूनला साजरा करूया. रत्नागिरी इथून सुरू झालेली विजयाची मिरवणूक ऐतिहासिक करू. या मिरवणुकीचे रत्नागिरीतून निघालेले पहिले टोक सिंधुदुर्गात पोहोचेल तेव्हा शेवटचे टोक रत्नागिरीत असेल असा विजय आनंदोत्सव साजरा करूया, असे आमदार नितेश राणे यांनी आवाहन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -