Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीGas Cylinder : ग्राहकांना दिलासा! सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात घट

Gas Cylinder : ग्राहकांना दिलासा! सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात घट

मुंबई : सध्या सोनं चांदीचे दर (Gold Silver Price Hike) गगनाला भिडत असताना अशातच ग्राहकांना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. जून महिन्याला सुरुवात झाली असून आजपासून वाहतुकीच्या अनेक नियमांत बदल झाले आहेत. त्यासोबत गॅस सिलेंडरच्या दरातही (Gas Cylinder Rate) घट केली असल्याची आनंदाची माहिती मिळाली आहे.

सलग तीन महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात घट

देशातील ऑईल कंपन्यांनी सलग तिसऱ्यांना व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी केले आहेत. गेल्या तीन महिन्यांत चार महानगरातील व्यावसायिक गॅस सिलिंडर ११९ ते १२४ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर जून महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७० ते ७२ रुपयांनी घट झाली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडर इतक्या रुपयांनी स्वस्त

आयओसीएलच्या (IOCL) माहितीनुसार, देशातील चार महानगरांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर ६९.५ रुपयांनी स्वस्त झाले आहे त्यामुळे आता दिल्ली आणि मुंबईत गॅस सिलिंडरचा दर क्रमश: १६७६ रुपये आणि १६२९ रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्याचबरोबर कोलकत्ता शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडर ७२ रुपयांनी स्वस्त झाला असून येथे सिलेंडरचा दर १७८७ रुपये झाला आहे. तर चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७०.५ रुपयांनी घट होऊन सिलिंडरचे दर १८४०.५० रुपयांनी उतरले आहेत.

घरघुती ग्राहकांच्या हाती निराशा

गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट होत आहे. मात्र या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही घट झालेली नाही. त्यामुळे घरघुती ग्राहकांच्या हाती निराशा आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -