Thursday, July 25, 2024
Homeक्राईमPune Crime : पुण्यात नेमकं चाललंय काय! तरुणीला गाडण्याचा धक्कादायक प्रयत्न

Pune Crime : पुण्यात नेमकं चाललंय काय! तरुणीला गाडण्याचा धक्कादायक प्रयत्न

चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात (Pune) सातत्याने कोयत्याने केलेला वार, गोळीबार, मारामारी, अपघात अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत. सध्या पुण्यात हिट अँड रन (Hit And Run) हे प्रकरण चर्चेत असताना आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वादातून २२ वर्षीय तरुणीला जिवंत गाडण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील राजगड तालुक्यामधील कोंढवळे गावात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आलेल्या २५ ते ३० जणांनी जेसीबीच्या सहाय्याने तरुणीच्या अंगावर माती टाकून तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित तरुणीसह तिच्या कुटुंबियांनी पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सदर प्रकरणासंबंधित काही नागरिक जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असताना, तरुणी आणि त्या नागरिकांमध्ये झालेल्या वादा दरम्यान ही घटना घडली. पीडित तरुणीने जागेवरील ताबा सोडण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी तरुणीच्या अंगावर ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून तिला गाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणीला साधारण कंबरेपर्यंत मातीमध्ये गाडल्याचे दिसत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल या चार आरोपींविरोधात ३०७ कलमअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात वापरण्यात आलेल्या ट्रॅक्टर आणि जेसीबीदेखील जप्त करण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -