Wednesday, April 30, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

T20 WC:उद्यापासून सुरू होतोय टी-२० वर्ल्डकप, २९ दिवस खेळवले जाणार ५५सामने

T20 WC:उद्यापासून सुरू होतोय टी-२० वर्ल्डकप, २९ दिवस खेळवले जाणार ५५सामने

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेची सुरूवात १ जून म्हणजेच उद्यापासून होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना डलासमध्ये हा सामना रंगणार आहे. अमेरिकेच्या वेळेतील बदलामुळे भारतात टी-२० वर्ल्डकपची सुरूवात २ जूनपासून होणार आहे.

स्पर्धेच्या नॉकआऊटसह एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. २९ दिवस हे सामने रंगणार आहेत. टीम इंडिया आपल्या अभियानाची सुरूवात ५ जूनपासून करत आहेत.

ग्रुप ए मध्ये टीम इंडियाचा समावेश आहे. टीम इंडिया चार लीगचे सर्व सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. तर काही संघ ग्रुप लीगचे सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहेत. अशातच क्रिकेट चाहत्यांच्या मनात स्पर्धेच्या टायमिंगबाबत सवाल आहेत.

काय आहेत टीम इंडियाच्या सामन्यांची वेळ

भारतीय चाहत्यांच्या मनात टीम इंडियाच्या सामन्यांच्या वेळेबाबत संभ्रम आहे. भारतीय संघाचे सर्व लीग सामने अमेरिकेत होत आहेत. सुरूवातीचे तीन सामने न्यूयॉर्क तर शेवटचा लीग सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. न्यूयॉर्कमध्ये खेळवले जाणारे सामने लोकल टायमिंगनुसार सकाळी साडेनऊ वाजता होतील. भारतीय वेळेनुसार या तीन सामन्यांची सुरूवात रात्री ८ वाजल्यापासून सुरू होतील. तर फ्लोरिडामध्ये खेळवल्या जाणाऱ्या टीम इंडियाच्या शेवटच्या लीगमधील लोकल टायमिंगनुसार सकाळी साडेदहा वाजता आहे. दरम्यान, भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल.

Comments
Add Comment