Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai Traffic : मुंबईकरांची दुहेरी कोंडी! एकीकडे मेगाब्लॉक दुसरीकडे ट्रॅफिकजाम

Mumbai Traffic : मुंबईकरांची दुहेरी कोंडी! एकीकडे मेगाब्लॉक दुसरीकडे ट्रॅफिकजाम

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) आजपासून तीन दिवस मेगाब्लॉक (Megablock) जारी केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे नागरिक एसटी, बस अशा इतर पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. प्रवाशांचा खोळंबा झाल्याने हैराण आहेत, अशातच त्यांना आणखी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मेगाब्लॉक दरम्यान एसटी महामंडळाने विशेष बस सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र मुलंड (Mulund) ऐरोली मार्गावर ट्रेलर घसरल्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची दुहेरी कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलंड ऐरोली मार्गावर ट्रेलर घसरल्यामुळे मुंबईकडून ऐरोलीला येणारी वाहतूक संथ गतीने होत आहे. त्यामुळे मार्गावर गाड्यांच्या दीड ते दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. या ट्रेलरला बाजूला करण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत. पण ट्रेलर बाजूला केल्यानंतर सुद्धा वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर मेगाब्लॉक असल्यामुळे अनेकजण स्वतःच्या खासगी वाहनाने बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आज दिवसभर राहणार आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेवर करण्यात आलेला मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे सध्या हाल होताना पाहायला मिळत आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे. त्यामुळे या कोंडीमधून बाहेर कसे पडावे असा प्रश्न सर्व प्रवाशांसमोर पडला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -