मुंबई: वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात सोन्या-चांदीचे दागिने आहेत तर ते ठेवण्याची योग्य दिशा माहीत असायली हवी. वास्तुशास्त्रानुसार घरात सोने-चांदी जर योग्य दिशेला ठेवले तर त्याचा लाभ जरूर मिळतो.
जर तुमच्या घरात सोने-चांदी योग्य दिशेला ठेवले नाही तर यामुळे नुकसानही होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार घरात धन आणि सोने-चांदीचे दागिने ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर दिशेला मानली जाते.
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार उत्तर दिशेचा संबंध लक्ष्मी मातेशी आणि भगवान कुबेराशी सांगितला गेला आहे.जर या दिशेला धन अथवा दागिने ठेवले तर लक्ष्मी माता आणि कुबेराची कृपादृष्टी राहते.
देवी-देवतांच्या कृपेने तुमची धनदौलत कधी कमी होत नाही तर नेहमी वाढतच राहते. ज्या घराच्या उत्तर दिशेला पैसा आणि सोने-चांदी ठेवतात तेथे आर्थिक समस्या येत नाही.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला कधीही पैसा ठेवू नये आणि कधीही दाग-दागिने ठेवू नयेत.