Sunday, June 22, 2025

Bollywood: प्रत्येक सिनेमा सुपरहिट तरीही या अभिनेत्रीने अभिनयाला केले बाय बाय

Bollywood: प्रत्येक सिनेमा सुपरहिट तरीही या अभिनेत्रीने अभिनयाला केले बाय बाय

मुंबई: भारतीय सिने क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपले करिअर अतिशय उंचीवर असताना अभिनयाला बाय बाय केले आहे. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे असिन आहे. जिने बॉलिवूडच नव्हे तर अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे.


असिनची सिने क्षेत्रातील सुरूवात मल्याळम सिनेमाने झाली होती. त्यानंतर तिने तेलुगु आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केले. अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केल्यानंतर तिला आमिर खानसह गजनी या हिंदी सिनेमात पदार्पणाची संधी मिळाली.


असिनने अक्षय कुमार, सलमान खान आणि अजय देवगण या अभिनेत्यांसोबतही सिनेमांमध्ये काम केले आहे.असिनने हिंदीमध्ये गजनी, लंडन ड्रीम्स, रेडी, हाऊसफुल्ल २, बोल बच्चन, खिलाडी ७८६, ऑल इज वेल या सिनेमांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे असिनचा प्रत्येक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट हिट ठरला होता.


मात्र अचानक करिअरमध्ये एका उंचीवर असताना अभिनेत्रीला बिझनेसमन राहुल शर्मासोबत प्रेम झाले. त्या व्यक्तीसाठी तिने आपल्या करिअरला अलविदा म्हटले आणि संसार सुरू केला.


असिन आता चित्रपटांपासून दर आहे ती आपल्या मुलीच्या देखभालीमध्ये व्यस्त आहे. ती ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर राहत आनंदाचे जीवन जगत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा