
मुंबई: मोटोरोलाने भारताता आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Moto G04s भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे Moto G04चे अपग्रेड व्हर्जन आहे. यात UniSoC T606 प्रोसेसर मिळतो.
हा हँडसेट 5000mAh बॅटरी आणि 15Wच्या चार्जिंगसोबत येतो. यात सिंगल रेयर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीे सिंगल रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केले आहे. जाणून घेऊया याची किंमत आणि इतर डिटेल्स
Moto G04sची किंमत
मोटोरोलाचा हा फोन ६९९९ रूपयांच्या किंमतीला लाँच झाला आहे. ही किंमत 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. Moto G04s हा फोन ५ जूनपासून सेलवर येईल.
तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, मोटोरोलाचा अधिकृत वेबसाईट तसेच काही निवडक रिटेल स्टोर्समधून खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन चार विविध रंगात उपलब्ध आहे. कॉनकर्ड ब्लॅक, सी ग्रीन, स्टेन ब्लू आणि सनराईज ऑरेंज.
स्पेसिफिकेशन
Moto G04sमध्ये ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass 3 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यात UniSoC T606 प्रोसेसर मिळतो. 4GB RAM + 64GB स्टोरेज आहे. 50 MP कॅमेरा आहे जो एलईडी फ्लॅशसह आहे. तर फ्रंटला 5MP कॅमेरा देण्यात आला आहे. 5000mAh बॅटरी आणि 15Wच्या चार्जिंग देण्यात आली आहे.