मुंबई: या वर्षी वटपोर्णिमेचे व्रत २० जूनला येत आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. उपवास करतात. या दिवशी वडाच्या झाडाची पुजा केली जाते. वडाच्या झाडाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. ज्या महिला या दिवशी वटसावित्रीचे व्रत करतात त्या काही उपाय करून आपले दाम्पत्य जीवन अधिक सुखी करू शकतात. यासोबतच त्यांच्या पतींचे आयुष्यही वाढू शकते.
करा हे सोपे उपाय
वटसावित्रीच्या दिवशी देव वृक्ष म्हटल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाखाली बसून सत्यवान आणि सावित्रीची पुजा करा. वटवृक्षाला ७ अथवा ११ फेऱ्या घालून इतर सूत लपेटून ठेवा.
यानंतर वटवृक्षाला जल अर्पण करा. वट सावित्री व्रताची कथा ऐका. यानंतर यमाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुसाठी प्रार्थना करा. त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या जेणेकरून तुमचा जीवनसाथी सुरक्षित आणि दीर्घायु राहो.
जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह सुरू असेल तर ते दूर करण्यासाठी आणि जीवन आनंदित बनवण्यासाठी वटसावित्री व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पुजा करा. या ठिकाणी तुपाचा दिवा लावा. नवऱ्यासोबत वडाच्या झाडाला ११ फेऱ्या घाला. लक्ष्मी नारायणाच्या आशिर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.
जर तुमची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे आणि कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. तर वटसावित्रीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पुजा करा. लक्ष्मी मातेला पिवळ्या रंगाच्या ११ कवड्या चढवा.