मुंबई: आचार्य चाणक्य यांनी दान करण्याची सवय ही उत्तम असल्याचे म्हटले आहे. दान दिल्याने धन कमी होत नाही तर ते वाढत जाते.
आचार्य चाणक्य यांनी खासकरून अशा ३ गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्याच्यासाठी पैसा खर्च करणे चांगले असते. चाणक्य यांच्या मते या ठिकाणी पैसा खर्च करण्यास कंजुसी करू नये. यामुळे तुमच्या संपत्ती वाढ होते.
चाणक्य सांगतात जर माणूस धनवान असेल तर त्याला गरीबांवर पैसे खर्च केले पाहिजेत. आचार्य चाणक्य यांच्या मते जर पैसे खर्च करायचे असतील तर धर्म-कर्माच्या नावावर केले पाहिजेत. यात मागे हटू नयेत.
प्रत्येक व्यक्तीला मंदिरात अथवा एखाद्या धार्मिक स्थळी दान करताना हात मागे नाही घेतला पाहिजे. समाज आणि देश कल्याणासाठी तसेच सामाजिक कार्यासाठी दान केले पाहिजे.
या तीन ठिकाणी पैसे खर्च केल्याने धन कमी होत नाही तर वाढतच राहते.