Tuesday, July 9, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीदेवरूपातील मामलेदारावर स्वामी कृपा

देवरूपातील मामलेदारावर स्वामी कृपा

समर्थ कृपा – विलास खानोलकर

स्वामीरायांच्या कृपातीर्थाबद्दल अशी एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे अहमदनगर येथे यशवंत महादेव जातकर नावाचा देवभक्त, देवभोळा, गरिबांना मदत करणारा ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. तालुक्याच्या ठिकाणी सरकार दरबारी परोपकारी नोकर म्हणून प्रसिद्ध होते. एकदा झोपेत स्वप्नात एका संन्याशाने शाळीग्राम दिला व याची रोज पूजा करा, गोरगरिबांना मदत करा आणि अक्कलकोटाला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन पवित्र व्हा, अशी आज्ञा केली. सकाळी उठून बघतात, तर खरोखर त्यांच्या उशाकडे शाळीग्राम ठेवलेला दिसला. लगेच त्याची देवघरात स्थापना करून पूजा-अर्चा सुरू करून ब्राह्मण जेवण घातले व एके दिवशी अक्कलकोटास हजर झाले. चोळप्पाच्या घरी साक्षात स्वामी समर्थाचे दर्शन घेताच, आश्चर्यचकित झाले व म्हणाले, स्वप्नातली देवमूर्ती व समोरील साधुमूर्ती दोन्ही एकच होती. त्यांनी स्वामींच्या पायावर लोटांगण घातले व शरण आले.

स्वामींची शोडषोपचारे पूजा करून ब्राह्मण जेवण घातले व म्हणाले स्वामी तुम्हीच खरे दत्तावतार आहात. मला तुमचा गुरुपदेश करा, माझे कल्याण करा. दोन-चार दिवस राहून स्वामींची जाण्याची अनुज्ञा घेतली. स्वामींनी आशीर्वाद दिला व उद्गारले. या जगात सुप्रिसद्ध साधुपुरुष म्हणून जगन्मान्य व्हाल. यशवंतराव परत अहमदनगर आले. चांगल्या जनसेवेत मामलेदार झाले व प्रेमाने लोक त्यांना देवरुपातील देवमामलेदार म्हणून पूजा करू लागले. लोकांचीही स्वामीभक्ती जगभर वाढू लागली व सर्व म्हणू लागले स्वामी समर्थ महाराज की जय।

वर्षा ऋतू स्वामी आगमन

सारे स्वामी दर्शनास आले परत।।१।।
त्याच्या कृपेने उघडले सारे डोळे
यशवंत महादेवाला दिला शाळीग्राम
रोज पूजा दिनरात घ्या स्वामीनाम।।२।।
देवपणामुळे झाले देवमामलेदार
नाशिकक्षेत्रे समाधी स्वर्गाचे दार ।।३।।
ज्यावरी झाली स्वामीकृपा
प्रत्यक्ष ब्रम्हाविष्णुमहेशाची कृपा ।।४।।
प्रसन्न तयाला त्रिगुणात्मक दत्तगुरु
स्वामीचे मार्गदर्शन तेच महागुरु ।।५।।
साथीरोगात कळीकाळाला अडविला
यमराजाला लांबलांब पळविला ।।६।।
वाचविली अनेक बालके निर्धाराने स्वामी
अनेक गरीबविधवा पैलतीरी नेली स्वामी ।।७।।
स्वामी म्हणे नका करु वाईट व्यसन
भक्तजन हो स्वामीनाम हेच व्यसन ।।८।।
नको पळी पंचपात्री, नारायण नागबळी
स्वामी नामाने दुर्जनाचे कानपिळी।।९।।
उठता बसता दिनरात्र सरता
स्वामीनामाने, दुःखसारे हवेत वीरता ।।१०।।
आनंदाने कामश्रम करा न पिरपिरता
अंगात हनुमान महादेवाची विरता ।।११।।
वैद्य,नर्स, पांडुरंग उभा दारोदारी
स्वामीरुपाने वाचवी दारोदारी ।।१२।।
निसर्गरुपाने पंचमहाभूत्वाने सांभाले स्वामी
पाणी,वारा, वायु, आकाश, शुद्ध करे स्वामी ।।१३।।
ऐका तो निसर्गरुपी आवाज स्वामींचा
सर्व पशुपक्षात आवाज स्वामींचा ।।१४।।
घरोघरी स्थापन होई निसर्गरुपी स्वामी
नववर्षाचे हेच दान द्यावे आम्हां स्वामी ।।१५।।
आले आले वर्षा ऋतू आले
इंद्रधनुष्याचे रंग उधळीत आले।।१६ ।।
स्वामी समर्थांच्या स्वागतास सूर्यनारायण आले
तेजस्वी सात घोड्यांचा रथ घेऊन आले।।१७।।
स्वामींच्या स्वागतास रविकिरण आले
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे।।१८।।
म्हणत स्वामी समर्थ रथातून आले
स्वामी जणू सुख वाटण्यास अवतरले।।१९।।
स्वामी समर्थ माझे आई
धाव पाव घ्यावा आई।।२०।।
स्वामी समर्थ माझे बाबाआई
तेच साईबाबा साई।।२१।।
स्वामी समर्थ ताईमाईआई
तेच माझे बहिणाबाई।।२२।।
अक्कलकोट माझे माहेर आई
केव्हा भेटण्यास येऊ मी आई।।२३।।
स्वामींचा मठच वाटे मला आई
मथुरा, काशी, गया आई वाई।।२४।।
स्वामींदर्शनाची मला घाई
गरीब बालकांची तीच दाई।।२५।।
जय जय स्वामी समर्थ,
तुम्हीच दिलात जगण्याला अर्थ।।२६।।
तुमचे काम सारे निःस्वार्थ
गरिबांची सेवा हाच परमार्थ।।२७।।
स्वामी म्हणती
व्हा तुम्ही मोठे
गोमातेसाठी बांधा तुम्ही गोठे।।२८।।
सर्व समाज करा मोठे
सर्व महाराष्ट्रा करा मोठे।।२९।।
भारत माता कि जय
स्वामी समर्थ महाराज कि जय

vilaskhanolkarkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -