CM Eknath Shinde : परदेशी कशाला जायचं? गड्या आपला गाव बरा!

आपल्या मातीतला व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला


सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदानाचा (Voting) शेवटचा टप्पा पार पडला आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व त्यांचे कुटुंबिय शिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjayt Raut) देखील लंडनला रवाना झाले. त्यामुळे यांचं महाराष्ट्रप्रेम बेगडी आहे, अशी टीका सत्ताधार्‍यांनी केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सातारा (Satara) जिल्ह्यातील दरे या आपल्या गावचा व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. 'परदेशी कशाला जायचं? गड्या आपला गाव बरा!', असं कॅप्शन देत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना परदेश दौर्‍यावरुन डिवचलं आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस सातारा दौऱ्यावर आहेत. तीन दिवस ते साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी मुक्काम करणार आहेत. या गावभेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गावातील शेतीची पाहणी केली. या गावभेटीचा सुंदर व्हिडिओ त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे.


या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री त्यांच्या शेतीत रमल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या शेतातील आंबा, फणसाच्या फळबागा, भाज्यांचे मळे तसेच पशुपालनाची पाहणी करत त्याची माहिती घेताना दिसत आहेत. "परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा, शेत पिकाची दुनिया न्यारी,वसे जिथे विठूरायाची पंढरी," असा सुंदर कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओला दिला आहे.





काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?


"लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते", अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली

हद्दपार गुंडाने शहरात वास्तव्य करत केला महिलेवर बलात्कार! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुणे: पु्ण्यात गुन्हेगारी क्षेत्रातील वाढ नवीन नसली तरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय