Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीSambhajinagar News : संभाजीनगरमधील सर्वच होर्डिंग अनधिकृत!

Sambhajinagar News : संभाजीनगरमधील सर्वच होर्डिंग अनधिकृत!

महापालिका प्रशासन खडबडून जागे; दिला ‘हा’ कडक इशारा

छत्रपती संभाजीनगर : मुंबईत पडलेल्या अवकाळी वादळी (Unseasonal Rain) पावसाने चांगलेच रौद्र रुप दाखवले होते. यामध्ये मुंबईकराचे मोठे नुकसान झाले होते. या अवकाळी पावसातील सर्वात भयंकर घटना म्हणजे घाटकोपर (Ghatkopar hoarding)  परिसरातील महाकाय होर्डिंग कोसळून अनेकांनी गमावलेला जीव. या प्रकरणानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हे होर्डिंग अनधिकृत असल्याचे उघडकीस आले होते. सदरच्या घटनेनंतर राज्यातील सर्व शहरातील होर्डिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून काहीच दिवसांत त्याचे महाराष्ट्रासह इतर देशात आगमन होणार आहे. मात्र मान्सूनमध्ये मुंबईत घडलेली होर्डिंग घटना इतर शहरात होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महापालिकेकडून देशांतर्गत सर्व होर्डिंग्सची पडताळणी करताना छत्रपती संभाजीनगर परिसरातील होर्डिंगबाबत मोठी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले ४१० होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणपत्राची मुदत दोन महिन्यांपूर्वीच संपली असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे हे सर्वच होर्डिंग अनधिकृत ठरले असून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महापालिकेचा कठोर इशारा

दरम्यान, संभाजीनगर महापालिकेने शहरातील सर्व होर्डिंग अनधिकृत ठरविले आहेत. त्यामुळे पुढील ७ दिवसात होर्डिंगसह संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट तयार करून अहवाल सादर करावा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासकांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -