Wednesday, October 9, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेMumbai Local : प्रवाशांचे हाल! मध्य रेल्वेवर तब्बल ६३ तासांचा मेगाब्लॉक

Mumbai Local : प्रवाशांचे हाल! मध्य रेल्वेवर तब्बल ६३ तासांचा मेगाब्लॉक

लोकल आणि लांब पल्ल्याच्या ९०० हून अधिक गाड्या रद्द

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) एक निवेदन जारी करून या मेगाब्लॉक विषयी माहिती दिली आहे. आज मध्यरात्रीपासून तब्बल ६३ तास म्हणजे जवळपास ३ दिवसांचा हा मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कारणामुळे मुंबईकरांचे आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात ९०० हून अधिक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशावेळी प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, यासाठी मुंबईतील कंपन्यांना शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (WFH) देण्याचे आवाहन देखील केले आहे.

मुंबईकरांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न

मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local) नेटवर्कसाठी प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वे आजपासून मध्यरात्री ६३ तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. या विकासामुळे मुंबई लोकल ट्रेनच्या सेवेवर आणि मुंबई लोकल ट्रेनवर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या कामाच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. परंतु ही दुरुस्ती आणि विस्तार मुंबईकरांना चांगली सेवा देण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी तीन दिवस सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

गरज नसल्यास प्रवास करु नका

सीएसएमटी (CSMT) आणि ठाणे (Thane) स्थानकांवर प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि रुंदीकरणासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्थानकादरम्यान ३० मे ते ३ जून दरम्यान तीन दिवसांचा मेगा ब्लॉक मध्य रेल्वेने जाहीर केला आहे. गुरुवारी रात्रीपासूनच हा मेगा ब्लॉक लागू होणार आहे. मुंबईच्या लोकलमधून रोज ७० लाख प्रवासी प्रवास करत असतात. मेगा ब्लॉकमुळे या प्रवाशांचे हाल होऊ शकतात. त्यामुळे गरज नसेल तर प्रवास करू नका, असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.

७२ एक्स्प्रेस आणि ९५६ लोकल गाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी सांगितले की, ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ च्या रुंदीकरणासाठी ६३ तासांचा मेगाब्लॉक गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरु होईल, तर सीएसएमटी (CSMT) स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ च्या विस्ताराशी संबंधित कामांसाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून ३६ तासांचा ब्लॉक सुरू होईल.

त्याचबरोबर मध्य आणि हार्बर मार्गावरील ७२ एक्स्प्रेस गाड्या आणि ९५६ मुंबई लोकल गाड्या शुक्रवार ते रविवार या कालावधीत रद्द केल्या जातील. वडाळा, दादर, पुणे, पनवेल आणि नाशिक येथून अनेक एक्स्प्रेस आणि मुंबई लोकल गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड आणि शॉर्ट-रूट केल्या जातील असे, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेवेची वाहूक पूर्वपदावर 

पालघर येथे मालगाडीच्या झालेल्या अपघातानंतर तब्बल २६ तासांनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली. २६ तासांनंतर पालघर प्लेटफॉर्म क्रमांक १ वरून डहाणूकडे रेल्वे रवाना करण्यात आली. तर डहाणूहून विरार कडे जाणारी पहिली लोकल प्लेटफॉर्म क्रमांक २ वरून रवाना करण्यात आली. दरम्यान, सध्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरून धीम्या गतीने गाड्या सोडण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -