Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीMPSC परीक्षा लांबणीवर! 'या' तारखेला होणार परीक्षा

MPSC परीक्षा लांबणीवर! ‘या’ तारखेला होणार परीक्षा

जाणून घ्या नेमकं कारण काय

मुंबई : राज्यसेवा परीक्षा (MPSC) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी माहिती मिळत आहे. ६ जून रोजी घेण्यात येणाऱ्या एमपीएससी परीक्षेच्या तारखेमध्ये काही कारणास्तव बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही परीक्षा आता लांबणीवर गेली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) मिळाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग १ आणि वर्ग २ प्रवर्गातील एकूण ५२४ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र काही आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्यामुळे परीक्षेच्या तारखेमध्येही बदल करण्यात आला आहे. ६ जून रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता २१ जुलै रोजी होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितले.

दरम्यान, आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एमपीएससी पूर्व परीक्षा २०२४ करीता जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातून अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे –

  • संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील My Account खालील प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या Link च्या आधारे इतर मागासवर्गातून अर्ज सादर करू शकणार आहेत.
  • उमेदवार Link समोर दर्शविण्यात आलेल्या Question या बटनावर क्ल्कि करून तेथे विचारण्यात आलेली सर्व माहिती भरल्यानंतर उमेदवार इतर मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -