Tuesday, March 25, 2025
Homeकोकणरायगडकल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज - उपमुख्यमंत्री अजित पवार

कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

पेण : मुंबई गोवा महामार्ग तयार होत असताना अनेक अडचणी आल्या महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या जवळही अनेक वेळा चर्चा करण्यात आल्या. या दरम्यान जुन्या रस्त्यांवर अनेक अपघात झाले आहेत. प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते आणि कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा वेगळा आनंद मिळाला पाहिजे. पण दुर्दैवाने अशा महामार्गावर अपघात होत असताना त्यांना मदत करण्याचे सेवा भावी काम पेण येथील कल्पेश ठाकूर हे करत आहेत, ते खरे देवदूत आहेत. त्यांच्यामुळे अनेक कुटुंबाना आणि कुटुंबातील माणसाला जीवदान मिळालेले आहे. कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्यअहवालाचे व साई सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भरभरून कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पेण विधानसभा मतदार संघांचे आमदार रवींद्र पाटील, अलिबाग विधानसभा मतदार संघांचे आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, नगराध्यक्षा प्रितम पाटील, उद्योजक यशवंत घासे, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, नरेंद्र ठाकूर, देवा पेरवी, सुनिल पाटील, नरेश पवार, विकी ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी कल्पेश ठाकूर यांच्या अपघातग्रस्तांना मदत व आरोग्य सेवेचे कौतुक करताना सांगितले की, अनेक वर्ष महामार्गावर अनेक अपघात झाले पण आता महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. इथे होणाऱ्या अपघातावेळी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी देवदूत बनून कल्पेश ठाकूर हा तरुण पुढे येऊन काम करत आहे. आज त्याच्या साई सहारा रेस्टोरंटचे उद्घाटन प्रसंगी हे हॉटेल व्यवसाय लवकरच नावा रूपाला येवो, अशा शुभेच्छा दिल्या.

तर पेण विधानसभा मतदार संघांचे आमदार रवींद्र पाटील, अलिबाग विधानसभा मतदार संघांचे आमदार महेंद्र दळवी, पेणचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे वाली व युवा उद्योजक कल्पेश ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे तर आभार संजय ठाकूर यांनी मानले. कल्पेश ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -