Monday, October 27, 2025
Happy Diwali

Indigo : फ्लाइट बुकींगमध्ये महिलांना मिळणार स्वातंत्र्य; इंडिगोने दिली 'ही' विशेष सुविधा!

Indigo : फ्लाइट बुकींगमध्ये महिलांना मिळणार स्वातंत्र्य; इंडिगोने दिली 'ही' विशेष सुविधा!

मुंबई : देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने (Indigo) महिलांचा विमान प्रवास अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे. महिलांना आता फ्लाइट बुकींगमध्ये स्वातंत्र्य मिळणार आहे. वेब चेक-इन दरम्यान सीट निवडताना महिला प्रवासी आता इतर महिलांनी कोणती सीट आधीच बुक केली आहे, ते पाहू शकणार आहेत. या सोयीमुळे महिला प्रवाशांना त्यांची जागा त्यांच्या सोयीनुसार निवडता येणार आहे.

एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, महिला प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक व्हावा, यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. विशेषत: एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी हा एक चांगला उपक्रम आहे. ज्यामुळे त्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव दुसऱ्या महिलेने घेतलेल्या सीटच्या शेजारी जागा बुक करता येणार आहे, असे एअरलाइन्सने म्हटले. त्याचबरोबर इंडिगो सर्व प्रवाशांना अतुलनीय प्रवासाचा अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि हे नवीन वैशिष्ट्य ते उचलत असलेल्या अनेक पावलांपैकी एक असल्याचे एअरलाइन्सने सांगितले.

सुरक्षित प्रवाशासाठी कंपनीचा निर्णय

एअरलाइन्समध्ये गेल्या काही महिन्यांत महिलांशी संबंधित अनेक धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. काही महिलांवर लैंगिक छळ, लघुशंका करणे अशा विचित्र घटना सातत्याने घडत होत्या. त्यामुळे विमान कंपनीची प्रतिमा खराब होते. या गोष्टी टाळण्यासाठी इंडिगोने हा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >