मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार टीम इंडियाने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये स्वत:ला पहिल्या स्थानावर ठेवले आहे. टीम इंडिया याआधीही अव्वल स्थानावर होती. टी-२० वर्ल्डकपआधी क्रमवारीत नंबर वन असल्याचा भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावेल.
क्रमवारीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने २६४ रेटिंगसह पहिल्या नंबरचा ताज आपल्या माथी कायम ठेवला आहे. तर ऑस्ट्रेलिया २५७ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर गतविजेता इंग्लंड संघ आहे. त्यांचे २५४ रेटिंग आहेत. वेस्ट इंडिज २५२ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे.
वेस्ट इंडिजने दोन स्थानांनी आघाडी घेत चौथे स्थान मिळवले आहे. त्यानंतर न्यूझीलंड २५० रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.
वेस्ट इंडिजला द. आफ्रिकेला ३-० असे हरवले होते
वेस्ट इंडिजने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवला होता. मालिकेतील पहिला सामना २८ धावांनी, दुसरा सामना १६ धावांनी आणि तिसरा ८ विकेटनी आपल्या नावे केला होता.
पाकिस्तान टॉप ५मध्ये नाही
क्रमवारीत पाकिस्तानच्या संघाला टॉप ५मध्ये स्थान मिळवता आलेले नाही. पाकिस्तान २४४ रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ २४४ रेटिंगसह सातव्या स्थानावर आहे.