Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीHealth: डायबिटीज आहे? या ४ पदार्थांपासून राहा दूर, नाही वाढणार साखर

Health: डायबिटीज आहे? या ४ पदार्थांपासून राहा दूर, नाही वाढणार साखर

मुंबई: भारतासह जगभरात डायबिटीज हा आजार सामान्य होत चालला आहे. डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हा आजार सायलेंट किलरसारखा आहे जो शरीराला आतून संपवतो. एकदा याच्या विळख्यात एखादा व्यक्ती सापडला तर आयुष्यभर त्याला हा आजार सोडत नाही.

तुम्हालाही जर डायबिटीज असेल तर काही पदार्थांपासून दूर राहिलेले बरे. काही असे खाद्यपदार्थ असे आहेत ज्याच्यापासून तुम्ही दूर राहून तुमची साखर नाही वाढणार.

गोड पदार्थांपासून राहा लांब

डायबिटीजच्या लोकांसाठी साखर अतिशय धोकादायक आहे. जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात तर तुम्हाला साखर आणि साखरेपासून बनलेल्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. मिठाई, केक, पेस्ट्री, शुगर ड्रिंक आणि इतर गोड पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे.

मैद्यापासून बनवलेले पदार्थ ठरतात धोकादायक

डायबिटीज असलेल्या रुग्णांनी मैदा आणि रिफाईंड पीठापासून बनवलेले पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढते. समोसे, सफेद भात, ब्रेड, पास्ता, पिझ्झा हे पदार्थ खाऊ नयेत.

सॉफ्ट ड्रिंक्सचे मर्यादित सेवन

सॉफ्ट ड्रिंक्स आणि फ्रूट ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात शुगर आणि कार्बोहायड्रेट असतात ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते. द्राक्षे, संत्री, आंबा या फळांच्या रसातही शुगर असते.

तेलकट पदार्थांपासून राहा दूर

याशिवाय बटाटा, मैदा, साखरपासून बनवलेल्या ब्रेडमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असते. गोड दलिया, नॉन डेअरी मिल्क, राईस मिल्क, बदामाचे दूध आणि एनर्जी बार, रताळे यांच्या सेवनानेही ब्लड शुगर वेगाने वाढते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -