Wednesday, March 19, 2025
Homeक्रीडाधोनी या दिवशी घेणार निवृत्ती, BCCIही रोखू शकणार नाही- दिग्गजाचा दावा

धोनी या दिवशी घेणार निवृत्ती, BCCIही रोखू शकणार नाही- दिग्गजाचा दावा

मुंबई: चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२४मध्ये काही खास कामगिरी केली नाही. त्यांना प्लेऑफमध्येही जागा मिळवता आली नाही. आयपीएल संपल्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्समधील वरिष्ठ क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या खेळण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

काही चाहते आणि क्रिकेट तज्ञांचे असे म्हणणे आहे की धोनी कदाचित पुढील हंगामात खेळू शकेल. आता धोनीबाबत सुनील गावस्कर यांचे विधान व्हायरल होत आहे. गावस्कर यांच्या मते धोनी ७ जुलैला मोठी घोषणा करू शकतो.

दरम्यान, गावस्कर यांनी सल्ला दिला आहे की धोनीने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करू नये. त्याला हवे तेवढे तो खेळू शकतो आणि बीसीसीआय त्यांना रोखू शकत नाही.

गावस्कर म्हणाले, मला वाटते की ७ जुलैला धोनी काहीतरी मोठी घोषणा करेल. धोनीने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करू नये. याच्याऐवजी त्याने खेळणे बंद केले पाहिजे आणि जेव्हा त्याला वाटेल तेव्हा खेळले पाहिजे. इतकंच की बीसीसीआयही त्याला रोखू शकत नाही. कारण तो स्पर्धेतून निवृत्ती घेत नाही आहे.

धोनीने आयपीएल २०२४मध्ये जबरदस्त फलंदाजी केली. धोनीने ११ डावांत २२०.५ च्या तुफानी स्टाईक रेटने १६१ धावा केल्या. ७ जुलैला महेंद्रसिंग धोनी ४३ वर्षांचा होत आहे. २०२०मध्ये ७ जुलैलाच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -