Monday, June 30, 2025

Jammu Accident : जम्मूमध्ये भीषण अपघात! १५० फूट खोल दरीत कोसळली बस

Jammu Accident : जम्मूमध्ये भीषण अपघात! १५० फूट खोल दरीत कोसळली बस

१५ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी


जम्मू : जम्मूच्या अखनूरमधून एका भीषण रस्ते अपघाताची (Jammu Accident) माहिती समोर आली आहे. जम्मू-पुच्छ महामार्गावरील अखनूर येथील तांडा वळणावर एक बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मूला जात होती. या बसमधून सुमारे ५० ते ६० जण प्रवास करत होते.


अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बचाव कार्यसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली. प्रवाशांनी भरलेली बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मूतील शिव खोडी येथे जात होती. त्यावेळी बस अखनूर येथील तांडा या वळणार आली असताना खोल दरीत कोसळली.


दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. लोकांचा आरडाओरडा सुरू झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना अखनूर रुग्णालयात आणि जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment