Sunday, May 11, 2025

ताज्या घडामोडी

Ayodhya : राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

Ayodhya : राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

अयोध्या : अयोध्येतील (ram ema) राम मंदिर (Ram Mandir) बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb Threat) दिल्याप्रकरणी कुशीनगर जिल्ह्यातील एका १४ वर्षीय मुलाला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.


कुशीनगरचे पोलीस अधीक्षक धवल जयस्वाल यांनी सांगितले की, मुलाला बौद्धिक अपंगत्व असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो आजीसोबत राहत होता, त्याच्या आजीलाही ताब्यात घेतले आहे.


या मुलाने मंगळवारी रात्री पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांक '११२' वर कॉल केला आणि तो मंदिर बॉम्बने उडवून देईल, अशी धमकी दिली. त्याने त्याच्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर तत्सम संदेशांसह पोस्ट देखील शेअर केल्या. सायबर सेलच्या मदतीने, पोलिसांनी कुशीनगरमधील कॉलचे लोकेशन ट्रेस केले आणि पाथेरवा पोलीस स्टेशन हद्दीतील बलुआ टाकिया या गावातून आरोपी मुलाला ताब्यात घेतले.

Comments
Add Comment