Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीWhatsapp Colour Feature : ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...व्हॉट्सअ‍ॅप आणणार 'ही' भन्नाट थीम!

Whatsapp Colour Feature : ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक…व्हॉट्सअ‍ॅप आणणार ‘ही’ भन्नाट थीम!

मुंबई : सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) हे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप आहे. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सर्व लोक या अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं म्हणून व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. अशातच व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता आणखी कलरफूल (Colour Feature) होणार आहे. युजर्सना अ‍ॅपमधील रंग बदलता येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नात असतो. याच प्रयत्नातून कंपनी चॅटसाठी थीम कस्टमायझेशन फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे वापरकर्ते त्यांच्या आवडीनुसार चॅटचा डिफॉल्ट थीम सेट करू शकणार आहेत. आत्तापर्यंत आपण व्हॉट्सअ‍ॅपवर फक्त दोनच रंगीत थीम पाहत होतो, नियमित मोड किंवा डार्क मोड. पण आता आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या रंगांच्या थीम निवडता येणार आहेत. याशिवाय यूजर्स चॅट बबलचा रंगही बदलू शकणार आहेत.

‘असं’ बदलू शकणार थीमकलर

  • WABetaInfo नुसार, हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या WhatsApp खात्याच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल, येथे तुम्हाला चॅटचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्याला थीम पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर व्हॉट्सअ‍ॅप यूजरला डिफॉल्ट चॅट थीमचा पर्याय दिसेल. तेथील कोणताही रंग निवडाल, ती डीफॉल्ट चॅट थीम बनेल.
  • यूजर्स थीम बदलताना चॅट बॅकग्राऊंड आणि चॅट बबल या दोन्हींचा रंग बदलेल.
  • अ‍ॅप यूजर्सना पाच कलर ऑप्शन देऊ शकते. यामध्ये हिरवा, निळा, पांढरा, गुलाबी आणि व्हायलेट या रंगांचा समावेश आहे. यानंतर त्यात आणखी रंग जोडता येणार आहेत.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या ios बीटा व्हर्जनवर या फिचरची चाचणी सुरू आहे. त्यानंतर हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -