मुंबई: क्रिकेटर्स गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा करत आहेत तो टी-२० वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या १ जूनपासून क्रिकेटच्या महासंग्रामाला अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरूवात होत आहे.
या स्पर्धेत भारत आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारताचा विराट कोहली या स्पर्धेत सर्वात यशस्वी क्रिकेटर ठरला आहे. कोहलीने टी-२० वर्ल्डकपच्या २७ सामन्यांमध्ये ११४१ धावा केल्या आहेत.
क्रिस गेलने टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. वेस्ट इंडिजच्या गेलने ३३ सामन्यात ६३ षटकार ठोकले आहेत.
रोहित शर्मा षटकार ठोकण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने ३९ टी-२० सामन्यांमध्ये ३५ षटकार ठोकले आहेत.
जोस बटलर आणि युवराज सिंह प्रत्येकी ३३ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.