
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक यांच्यातील घटस्फोटांच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी दोघांनीही मौन बाळगले आहे. मात्र एकामागोमाग एक प्रकारच्या मीडिया रिपोर्ट्समधून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.
यातच आता एक आणखी रिपोर्ट आला आहे यात दावा करण्यात आला आहे की हार्दिक आणि नताशा यांच्यात गेल्या ६ महिन्यांपासून आलबेल नाही. दोघांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला आहे. असे मानले जात आहे की हे स्टार कपल घटस्फोट घेऊ शकते.