Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीLIC : सरकारी खजिन्यात पडणार 'इतक्या' कोटींची भर; एलआयसी देणार घसघशीत लाभांश

LIC : सरकारी खजिन्यात पडणार ‘इतक्या’ कोटींची भर; एलआयसी देणार घसघशीत लाभांश

मुंबई : काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सरकारला तब्बल २.११ लाख कोट्यावधी रुपयांचा घसघशीत लाभांश दिला होता. त्यामुळे सरकारची पेटी चांगलीच भरली होती. त्यानंतर आता सरकारची पेटी आणखी भरण्याची माहिती मिळत आहे. आरबीआयनंतर आणखी एका संस्था कडून सरकारला तब्बल कोट्यावधी रुपयांचा लाभ मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसी (LIC) ही देशातील सर्वांत मोठी आणि सर्वाधिक विश्वासार्ह अशी जीवन विमा कंपनी आहे. देशातील कोट्यवधी लोक आपला विमा या संस्थेच्या माध्यमातून काढतात. ही संस्था सरकारी असल्यामुळे लोकांना त्यांचे पैसे बुडण्याचा धोका नसतो. म्हणून ही संस्था गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान, या संस्थेच्या चौथ्या तिमाहिचा नुकताच निकाल समोर आला आहे. निकालानुसार, चांगली कामगिरी केल्यामुळे या संस्थेला कोट्यावधी रुपयांचा नफा झालेला आहे. त्यामुळे या लाभांशाचा भारत सरकारला चांगलाच फायदा होणार आहे.

तब्बल ३६६२ कोटी रुपयांचा लाभांश देणार 

चौथ्या तिमाहीत एलआयसीच्या नफ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली असून तब्बल १३ हजार ७६३ कोटींचा नफा झाला आहे. त्यामुळे ही संस्था आता केंद्र सरकारला ३६६२ कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे. सरकारची यामध्ये साधारण ९६.५ टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे या कंपनीने सरकारला प्रतिसमभाग सहा रुपयांच्या दराने लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, एलआयसी आणि आरबीआय या दोन्ही संस्थांकडून मिळणाऱ्या लाभांशामुळे सरकारच्या तिजोरीत लाखो कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. या पैशांच्या मदतीने सरकारला वित्तीय तूट भरून काढण्यास मदत होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -