Tuesday, June 24, 2025

Flipkart sale ची झाली घोषणा, या तारखेपासून होणार सुरू

Flipkart sale ची झाली घोषणा, या तारखेपासून होणार सुरू

मुंबई: स्वस्तात प्रॉडक्ट खरेदी करण्याची तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. फ्लिपकार्टने आपल्या आगामी सेलची घोषणा केली आहे. यात ८० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिला जाणार आहे.



१ जूनपासून सुरू होणार सेल


कंपनीने फ्लिपकार्ट बिग एंड ऑफ सीझन सेलची घोषणा केली आहे. हा सेल १ जून ते ८ जून दरम्यान चालेल.


यात १० टक्के अतिरिक्त डिस्काऊंट मिळत आहे. यासाठी ग्राहकांना फ्लिपकार्ट यूपीआयचा वापर करावा लागेल.


कंपनीने या सेलमध्ये अधिक फोकस फॅशन प्रॉडक्ट्सवर ठेवला आहे. सेलमध्ये अनेक सेक्शन असतील. यात ग्राहकांनी स्पेशल डील मिळेल.



जिंकू शकता आयफोन


सेलमध्ये आयफोन जिंकण्याची संधी मिळेल. दरम्यान, कंपनीने याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. फ्लिपकार्ट सेलमधून तुम्ही दररोजचे सामानही खरेदी करू शकता. दरम्यान, यात इलेक्ट्रॉनिक्सवर कोणतीही खास ऑफर दिसत नाही आहे.



मायक्रोसाईट झाली लाईव्ह


सेलची मायक्रोसाईट लाईव्ह झाली आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत अॅपवरून तुम्ही अॅक्सेस करू शकता. सेलमध्ये घड्याळ्यांवर चांगले ऑफर्स मिळत आहेत.


जर तुम्ही मोबाईल फोनवर ऑफरची वाट पाहत आहात तर तुम्हाला चांगले डील मिळणार नाही.

Comments
Add Comment