Sunday, June 30, 2024
Homeक्राईमFake Notes : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सापडल्या बनावट नोटा!

Fake Notes : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सापडल्या बनावट नोटा!

दोन महिला गजाआड; मोठं रॅकेट असण्याची शक्यता

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) काल अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा (Fake Notes) बनवून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून त्यातील एक जण फरार आहे. नाशिकमधील हे प्रकरण चर्चेत असतानाच सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये आणखी बनावट नोटा आढळल्याने आणि या नोटा चक्क महिलांकडूनच बाजारात पुरवठा केला जात असल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल अंबड हद्दीत २३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. त्यापाठोपाठ नाशिकरोड परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणताना दोन महिला आढळून आल्या आहेत. या महिलांनी ५०० रुपयांच्या तब्बल १० हजार बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.

दरम्यान, नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांचा मोठा रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता कुठपर्यंत जाणार? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर बाजारात अशा अजून किती बनावट नोटा आहेत आणि या प्रकरणात आणखी कोण सक्रीय आरोपी आहेत. याबाबत पोलिसांकडून कडक तपास सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -