Saturday, October 25, 2025
Happy Diwali

राजस्थान-हरियाणामध्ये प्रचंड उकाडा, या शहरांमध्ये तापमानाचा पारा ५० अंश पार

राजस्थान-हरियाणामध्ये प्रचंड उकाडा, या शहरांमध्ये तापमानाचा पारा ५० अंश पार

मुंबई: उत्तर आणि मध्य भारतातील मोठा भाग भीषण उन्हाच्या तडाख्यात आहे. राजस्थानच्या चुरू आणि हरयाणाच्या सिरसामध्ये तापमान ५० डिग्री सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा या मोसमात सामन्यपेक्षा नऊ अंश सेल्सियसनी अधिक आहे. दिल्लीमध्ये कमीत कमीत तीन हवामान केंद्रांवर कमाल तापमान ४९ डिग्रीहून अधिक दाखल झाले आहे.

राजस्थानच्या चुरू भागात सर्वाधिक तापमान आहे. येथे कमाल तापमान ५०.५ डिग्री सेल्सियस इतके दाखल झाले. यानंतर हरयाणाच्या सिरसा-एडब्लूएसमध्ये ५०.३ डिग्री, दिल्लीच्या मुंगेशपूर आणि नरेलामध्ये ४९.९ डिग्री, नजफगडमध्ये ४९.८ डिग्री, राजस्थानच्या गंगानरगमध्ये ४९.४ डिग्री, राजस्थानच्या पिलानी आणि फलोदी आणि उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये ४९ डिग्री अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

हरयाणामध्ये शाळेची सुट्टी वाढवली

भीषण उन्हामुळे हरयाणा सरकारने सरकारी आणि खासगी शाळांतील उन्हाळ्याच्या सुट्टीत मंगळवारपर्यंत वाढ केली आहे. उन्हामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी तसेच विजेची कमतरता निर्माण होत आहे.

डोंगराळ भागातही सूर्य ओकतोय आग

जम्मूध्ये पुढील सात दिवस भीषण उकाडा असणार आहे. जम्मूध्ये सोमवारी कमाल तापमान ४३ डिग्री नोंदवले गेले. तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सियस होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >