Sunday, October 19, 2025
Happy Diwali

तुम्ही बायकोशी सतत भांडत तर नाही ना...

तुम्ही बायकोशी सतत भांडत तर नाही ना...

मुंबई: लक्ष्मी माता ही लक्ष्मी, धन आणि समृद्धीची देवता आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने मनुष्याच्या जीवनात कधीही धन तसेच वैभवाची कमतरता येत नाही. लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी लोक नानाविध उपाय करत असतात. दरम्यान, काही कामे केल्याने मात्र लक्ष्मी माता नाराज होऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल...

लक्ष्मी माता त्याच घरात वास करते ज्यांच्या घरात सुख-शांती आणि प्रेमाचे वातावरण असते. ज्या घरात पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असतात, तसेच ज्या घरात महिलांचा सन्मान केला जात नाही तेथे लक्ष्मी कधी येत नाही.

पती-पत्नीमध्ये होणाऱ्या वादामुळे घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते. शास्त्रात सांगितले आहे की जे पती दर छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या पत्नीशी वाद घालतात त्यांना लक्ष्मी मातेची नाराजी झेलावी लागते. अशा घरात नेहमीच कंगाली असते.

वाद आणि भांडणे केवळ नकारात्मक उर्जा निर्माण करतात. यामुळे घरात अशांती आणि तणावाचे वातावरण असते. लक्ष्मी माता ही शांती आणि सकारात्मकतेची देवी आहे. यामुळे नकारात्मक वातावरणात ती राहत नाही.

पती-पत्नी नेहमीच भांडणे करत असतील तर याचा अर्थ ते एकमेकांसोबत सुखी नाहीत. लक्ष्मी माता सुख-समृद्धी आणि संतोषाची देवता आहे. यासाठी ती त्याच घरात राहते जिथे लोक संतुष्ट असतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा