मुंबई: अनेकांना सवय असते की दुसऱ्यांची कोणतीही वस्तू न विचार करता वापरतात. दरम्यान वास्तुशास्त्रात सांगितले आहे की दुसऱ्यांच्या काही वस्तू वापरल्याने तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात.
वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीला आपल्या मनगटावर दुसऱ्या कोणाचेही घड्याळ बांधले नाही पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार असे करणे अयोग्य मानले जाते. यामुळे त्या व्यक्तीच्या समस्या वाढू लागतात.
घड्याळाला नेहमी नकारात्मक आणि सकारात्मक उर्जा येत असते. दुसऱ्याचे घड्याळ वापरणे शुभ नाही. असे केल्याने आपली वाईट वेळ सुरू होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा रूमाल वापरला नाही पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्याचे कपडेही घालू नयेत. असे करणे योग्य मानले जात नाही. असे केल्याने नकारात्मक उर्जा आपल्यात प्रवेश करते आणि जीवनात संकटे येण्यास सुरूवात होते.