Sunday, August 31, 2025

२६ तासांनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

२६ तासांनंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पालघर : पालघर रेल्वे स्थानकात मंगळवारी संध्याकाळी मालगाडीच्या झालेल्या अपघातानंतर आज बुधवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या दरम्यान जवळपास २६ तासांनंतर विरारहून पहिली लोकल पालघरच्या प्लेटफॉर्म क्रमांक १ वरून डहाणूकडे रवाना करण्यात आली. त्यानंतर डहाणूहून विरार कडे जाणारी पहिली लोकल पालघर रेल्वे स्टेशनच्या प्लेटफॉर्म क्रमांक २ वरून विरारकडे रवाना करण्यात आली.

काल संध्याकाळ पासून पच्छिम रेल्वेची विरार ते डहाणू दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सध्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरून धीम्या गतीने गाड्या सोडण्यात येत आहेत.

Comments
Add Comment