Saturday, April 26, 2025
Homeक्रीडाTeam india: गौतम गंभीर बनणार टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक?

Team india: गौतम गंभीर बनणार टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक?

मुंबई: गौतम गंभीरने(gautam gambhir) टीम इंडियासाठी जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. तो वर्ल्डकप विजेत्या संघाचा भागही होता. गंभीर एक मेन्टॉर म्हणूनही हिट ठरला आहे. तो आयपीएल २०२४मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर होता आणि संघाने खिताब जिंकला. टीम इंडिया सध्या नव्या प्रशिक्षकपदाचा शोधात आहे. एका रिपोर्टनुसार गंभीरला टीम इंडियाचा प्रमुख प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. याबाबत बीसीसीआयमध्ये बातचीत सुरू आहे.

एका रिपोर्टनुसार एका आयपीएल फ्रेंचायजीच्या ऑनरने याबाबत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितले ही गौतम गंभीरला पुन्हा प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. याबाबत बीसीसीआयची त्याच्यासोबत मीटिंगही झाली आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाऊ शकते. दरम्यान, आतापर्यंत टीम इंडियाच्या हेडकोचबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

गंभीरच्या उपस्थितीत केकेआर बनली चॅम्पियन

गंभीर केकेआरच्या आधी लखनऊ सुपर जायंट्सटा मेन्टॉर होता. त्याच्या उपस्थितीत संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र त्याने मेन्टॉरशिप सोडताच कामगिरी घसरली. लखनऊचा संघ आयपीएल २०२४च्या प्लेऑफपर्यंतही पोहोचू शकला नाही. तर दुसरीकडे केकआरने खिताब जिंकला. केकेआर आयपीएल २०२४च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला होता.

दमदार होते आंतरराष्ट्रीय करिअर

गौतम गंभीरचे आंतरराष्ट्रीय करिअर दमदार राहिले. तो टीम इंडियासाठी १४७ वनडे सामने खेळला. यात त्याने ५२३८ धावा केल्या. गंभीरने वनडेत ११ शतके आणि ३४ अर्धशतके लगावली. त्याने ५८ कसोटीत ४१५४ धावा केल्या. या दरम्यान ९ शतके आणि २२ अर्धशतके ठोकली. तसेच दुहेरी शतकही ठोकले. गंभीर भारतासाठी ३७ टी-२० सामने खेळला. यात ९३२ धावा केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -