Friday, July 11, 2025

शाहिद-मीराने मुंबईत घेतले आलिशान घर, सिनेमाच्या बजेटपेक्षाही अधिक किंमत

शाहिद-मीराने मुंबईत घेतले आलिशान घर, सिनेमाच्या बजेटपेक्षाही अधिक किंमत

मुंबई: बॉलिवूड स्टार शाहिद कपूरसाठी २०२४ हे वर्ष चांगले आहे. यावर्षी तेरी बातों मे ऐसा उलझा जिया हा सिनेमा बॉलिवूडमधील हिट ठरला. आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असलेल्या शाहिदने हे वर्षी अधिक विस्मरणीय बनवण्यासाठी आणखी एक डील केले आहे.


शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूरने मुंबईच्या वरळी भागात नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. रिपोर्ट्सनुसार शाहिद आणि मीराने सेंट्रल मुंबईतील परिसरात शानदार लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. यासाठी स्टार कपलने स्टम्प ड्युटी जोडत तब्बल६० कोटी रूपये खर्च केले आहेत.



मुंबईच्या पॉश भागात शाहिदने खरेदी केले घर


शाहीद आणि त्याच्या पत्नीने वरळीच्या ओबेरॉय ३६० वेस्ट प्रोजेक्टमध्ये हे घर खरेदी केले आहे. रिपोर्ट्सनुसार हे घर ५३९५ स्क्वे फूटाचे आहे. यात तीन पार्किंग स्पेसही आहेत.


या प्रोजेक्टमध्ये शाहिदचे हे पहिलेच घर नाही तर या बिल्डिंगमध्ये शाहिदने २०१८मध्ये ८२८१ स्क्वे फूटचे एक अपार्टमेंट खरेदी केले होते. त्यावेळेस त्याने ५८ कोटी रूपये खरेदी केले होते.

Comments
Add Comment