पालघर : पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी ५ ते ६ डब्बे घसरल्याने गुजरातहून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा पुर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी मालगाडी पालघर रेल्वे स्टेशनवरती पलटी झाली आहे. मालगाडीचा अपघात इतका भीषण होता की, दोन क्रमांकाचा रेल्वे ट्रक पूर्णपणे उखडले गेले आहे. त्यामुळे ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही डब्बे घसरले आहेत तर काही डब्बे पुर्णपणे पलटी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. ही मालगाडी मुंबईकडे जात असताना ही घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून चौथ्या रुळावर क्रॉसिंग करत असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी नसली तरी मालगाडीचे डबे रेल्वे रुळावर पडल्यामुळे रेल्वेची मुंबईकडील वाहतूक कोलमडली.
घसरलेली मालगाडी पाहण्यासाठी रेल्वे प्रवासी वर्गासह नागरिकांची मोठी गर्दी केली होती. विरारहून डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…