Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीक्राईम

Pune crime : पुण्यात चाललंय काय? सनकी तरुणाने गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडला गाडीने उडवलं!

Pune crime : पुण्यात चाललंय काय? सनकी तरुणाने गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडला गाडीने उडवलं!

एक्स बॉयफ्रेंडवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना (Pune crime) वाढत चालल्या असून दिवसेंदिवस धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. कधी कोयतागँग, कधी गोळीबार तर कधी भयंकर अपघाताच्या घटनांनी शिक्षेचे माहेरघर असलेल्या पुण्याला कलंक लागला आहे. त्यातच आणखी एक विचित्र घटना पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधून (Pimapri chinchwad) समोर आली आहे. गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडला बघून राग अनावर झाल्याने एका तरुणाने त्याला गाडीने उडवल्याची घटना घडली आहे. सध्या एक्स बॉयफ्रेंडवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

पिंपरी- चिंचवडमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी ही घटना घडली. प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवले. या प्रकरणी सुशील भास्कर काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. तर निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश शिंदे हा एका युवतीचा आधी बॉयफ्रेंड होता. मात्र सध्या तिचे सुशील काळे सोबत प्रेमसंबंध आहेत. निलेशने तिला त्रास दिल्याचं तिचं म्हणणं आहे. काल रात्री उशिरा एक्स बॉय फ्रेंड निलेश हा युवतीला भेटायला आला होता. याबाबतची माहिती तरुणीने सुशीलला दिली. निलेश जेव्हा भेटायला आला तो युवतीशी बोलत होता त्यावेळी सुशीलने चारचाकी गाडीने निलेशला उडवलं. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर अनेक लोकांनी मिळून पोलिसांना या अपघातासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी प्रियकराला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलीस सगळी माहिती घेत आहेत. नेमका वाद फक्त गर्लफ्रेंडवरुन झाला की अजून कोणत्या कारणावरुन झाला आहे?, याची माहिती पोलीस घेत आहेत.

Comments
Add Comment