Sunday, July 14, 2024
Homeक्राईमPune car Accident : अग्रवाल पिता-पुत्राला चार दिवसांची पोलीस कोठडी!

Pune car Accident : अग्रवाल पिता-पुत्राला चार दिवसांची पोलीस कोठडी!

आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

पुणे : पुणे अपघात (Pune car Accident) प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) याला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुलगा अल्पवयीन असूनही त्याच्या हातात कार दिल्यामुळे ही अटक करण्यात आली होती. तर मुलाचे आजोबा सुंरेंद्र कुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) यांना देखील २८ मे पर्यंत तुरुंगात ठेवण्यात आलं. मुलाचा आरोप ड्रायव्हरने स्वतःच्या अंगावर घ्यावा, यासाठी ड्रायव्हरवर दबाव टाकल्याप्रकरणी व त्याला डांबून ठेवल्याप्रकरणी सुंरेंद्र कुमारवर ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर आज झालेल्या सुनावणीत अग्रवाल पिता-पुत्राला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघेही आता ३१ मे पर्यंत पोलीस कोठडीत असणार आहेत.

पोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं होतं. ड्रायव्हरचं अपहरण, मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा, आणि तसं न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली. आजोबा सुरेंद्रकुमार आधी अटकेत होते, विशाल अग्रवालला याप्रकरणी आज अटक करण्यात आलेली आहे.

कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये खडाजंगी झाली. सरकारी वकिलांनी दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आरोपी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ससूनमधील दोन डॉक्टरांनाही अटक

कल्याणीनगर येथील अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायालाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी कोर्टाने डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -